top of page

राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

  • dhadakkamgarunion0
  • Apr 17
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

● राज्यातील २० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच सूक्ष्म-लघु उद्योजकांसाठी प्रशिक्षण, उद्योजक मेळावे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे तांत्रिक शिक्षण व रोजगार संधी वाढवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हे करार संपन्न झाले. पहिल्या त्रिपक्षीय करारात श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांचा समावेश आहे. दुसऱ्या करारात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि पुण्यातील देआसरा फाउंडेशन यांनी उद्योजकता वाढवण्यासाठी करार केला. तिसऱ्या करारात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि प्रोजेक्ट मुंबई यांनी आय.टी.आय.मधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण, सांकेतिक भाषेतील अभ्यासक्रम आणि ऑन-द-जॉब प्रशिक्षणासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page