राज्याच्या विकासाचे चक्र गतीमान; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली वस्तूस्थिती
- dhadakkamgarunion0
- Dec 15, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज्याच्या विकासाचे चक्र गतीमान; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली वस्तूस्थिती
● विरोधकांकडून राज्यावर वाढलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून वारंवार टीका केली जाते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, विकासकामांसाठी कर्ज घेणे प्रत्येक राज्यासाठी आवश्यक असते. राज्याचे स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज यांच्या गुणोत्तराचा विचार केल्यास, आपण अजूनही धोक्याच्या पातळीच्या खाली आहोत. राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज असेल, तर अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे मानले जाते; मात्र महाराष्ट्राचे कर्ज सध्या १८.८७ टक्के इतकेच आहे. यामुळे आर्थिक शिस्त पाळली जात असल्याचे स्पष्ट होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्राने गुंतवणुकीत मोठी आघाडी घेतली आहे. केवळ करार करून थांबलो नाही, तर मागील तीन वर्षांत करण्यात आलेल्या १५ लाख ७२ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीपैकी सुमारे ५ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक एकट्या विदर्भामध्ये झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही मोठ्या प्रमाणात निधी आणि गुंतवणूक येत आहे. यामुळे राज्याच्या विकासाचे चक्र गतीमान झाले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments