राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक संदेश
- dhadakkamgarunion0
- 17 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक संदेश
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे की, महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीच्या बाबतीत संपूर्ण देशात आघाडीवर आहे. याचबरोबर 'लाडकी बहीण' यांसारख्या लोकप्रिय कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावर राबवूनही राज्याची अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारे दिवाळखोरीकडे गेलेली नाही. राज्याने केलेली कर्ज उभारणी देखील केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांच्या आतच आहे. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे राज्याच्या प्रगती आणि आर्थिक स्थैर्याबद्दल एक चांगला व सकारात्मक संदेश सर्वत्र पोहोचला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, महाराष्ट्र राज्याने देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. राज्याला अधिक सक्षम आणि स्थिर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. या रोडमॅपनुसार, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र देशाला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देणारे पहिले राज्य बनेल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे यावर सरकारचा विशेष भर आहे, ज्यामुळे राज्याची वाटचाल महासत्तेच्या दिशेने वेगाने सुरू आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments