अमित साटम यांचे विरोधकांना आव्हान घेतला आक्रमक पवित्रा
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांचे विरोधकांना आव्हान घेतला आक्रमक पवित्रा
● मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, असा विश्वास मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. साटम यांच्या वक्तव्याने भाजपा आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, तर विरोधी पक्षांना त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले आहे. अमित साटम यांनी आपल्या घोषणेद्वारे विरोधकांना स्पष्टपणे आव्हान दिले आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित करून, विरोधकांच्या सत्ताकाळात झालेल्या त्रुटी मतदारांसमोर मांडण्याचा भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि सद्यस्थितीचा विचार करून महायुती यंदा १५० हून अधिक जागा जिंकेल, असा दावाही साटम यांनी केला आहे. 'मुंबईकरांना आता बदल हवा आहे आणि तो बदल महायुती नक्कीच घडवून आणेल,' असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक संचालन समिती नेमण्यात आली आहे. भाजपा सध्या वॉर्डनिहाय तयारी करत असून, प्रत्येक वॉर्डमधील मतदारांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी एक विशेष अभियान देखील राबवले जात आहे. महायुतीच्या माध्यमातून मुंबईकरांना पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments