रवींद्र चव्हाण यांची आक्रमक रणनीती केडीएमसीत भाजपाला करणार मोठा भाऊ
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण यांची आक्रमक रणनीती केडीएमसीत भाजपाला करणार मोठा भाऊ
● कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती, त्यात भाजपाही भागीदार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत धडाकेबाज पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांतील नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपामध्ये आणले आहे. या पक्षप्रवेशांमुळे भाजपाची स्थानिक पातळीवरील ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील नेत्यांना भाजपाने आपल्याकडे खेचल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. याच वाढलेल्या ताकदीच्या जोरावर भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपात बरोबरीचा वाटा मागणे यात काहीच गैर नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आक्रमक रणनीती पाहता येथे भाजपासाठी अतिशय चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. अशा स्थितीत या वातावरणाचा उपयोग पक्षासाठी करून घेण्याची आग्रही भूमिका रवींद्र चव्हाण यांची आहे आणि ती योग्यही आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments