राजकीय नैराश्यातून विरोधकांचे रवींद्र चव्हाणांवर बिनबुडाचे आरोप
- dhadakkamgarunion0
- 7 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
राजकीय नैराश्यातून विरोधकांचे रवींद्र चव्हाणांवर बिनबुडाचे आरोप
● जेव्हा जेव्हा एखादा मोठा नेता किंवा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो, तेव्हा त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडणे ही विरोधकांची जुनी पद्धत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रलोभने देऊन पक्ष फोडतात हा विरोधकांचा बिनबुडाचा आरोपही असाच आहे. जनमानसातील चव्हाण यांची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विकासाच्या मुद्द्यावर लढण्याऐवजी वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करणे हे त्यांच्या वैचारिक पराभवाचे लक्षण आहे. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कामाच्या जोरावर पक्ष संघटना मजबूत केली आहे. त्यामुळे त्यांना अशा खालच्या स्तरावरील आरोपांनी फरक पडत नाही. जनतेला सत्य माहित आहे आणि ते योग्य वेळी कौल देतील. सरकारने केलेली लोकोपयोगी कामे आणि विकास योजनांमुळे जनतेचा ओढा महायुतीकडे वाढत आहे. हे पाहून विरोधक घाबरले आहेत. त्यामुळेच चर्चेचा विषय बदलण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पक्ष फोडणे हा भाजपाचा स्वभाव नसून, लोकशाही मार्गाने जनहित जोपासणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments