राज-उद्धव भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान
- dhadakkamgarunion0
- Jul 28
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज-उद्धव भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान
● राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणे योग्य नाही. पण राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसले आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.’ यातील शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे, यातून फडणवीसांनी योग्य तो संदेश सगळ्यांना दिला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments