रवींद्र चव्हाण; राजकीय मैदानावरील 'मनाने मोठे' नेतृत्व
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण; राजकीय मैदानावरील 'मनाने मोठे' नेतृत्व
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेहमीच आपल्या राजकीय आणि संघटनात्मक कामांमुळे चर्चेत असतात. त्यांच्यावर टीका झाली तरी, विरोधकांचे मत विचारात घेऊन पुढे जाण्याची त्यांची भूमिका असते. रवींद्र चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि अन्न, नागरी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाराष्ट्रात १.५ कोटींहून अधिक सदस्य नोंदणी करून राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्यांचे हे संघटनात्मक कार्य, पक्षाप्रती निष्ठा आणि विकासावर असलेले लक्ष त्यांना 'मनाने मोठे' नेतृत्व म्हणून सिद्ध करते.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments