रवींद्र चव्हाण; राजकीय मुत्सद्देगिरी आणि विकासकार्याची हातोटी
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण; राजकीय मुत्सद्देगिरी आणि विकासकार्याची हातोटी
● भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राजकीय निर्णयक्षमता आणि विकासकामांची चांगली जाण ही त्यांच्या कारकिर्दीची मुख्य ओळख आहे. डोंबिवलीसारख्या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे चव्हाण हे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्य पातळीवरील राजकारणातही अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद आणि त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्या नेतृत्वशैलीत दूरदृष्टी आणि कामाचा झपाटा स्पष्टपणे दिसून येतो. रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक मजबूत केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाने विक्रम रचला. पक्षाच्या 'संघटन पर्व' अभियानाचे प्रदेश प्रभारी म्हणून त्यांनी १ कोटी ५१ लाखांहून अधिक प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात मोलाची भूमिका बजावली, ज्यामुळे भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तसेच, महायुतीमधील स्थानिक स्तरावरील मतभेद हाताळताना त्यांची राजकीय समज आणि तडजोडीची भूमिका अनेकदा दिसून येते, जी त्यांची उत्कृष्ट राजकीय मुत्सद्देगिरी दर्शवते.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments