रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
- dhadakkamgarunion0
- Dec 22, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
● ठाण्यातील भाजपाच्या सर्व मंडल अध्यक्षांनी शिवसेनेसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र सुपूर्द केले आहे. ठाण्यात भाजपाची ताकद मोठी असून आपल्याला कोणाच्याही पालखीचे भोई होण्याची गरज नाही, अशी आक्रमक भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः ठाणे जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत. त्यांच्याकडे ही तक्रार आल्यामुळे आता ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करतील अशी शक्यता आहे. मंडल अध्यक्षांच्या मते, युतीमुळे भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेचे वर्चस्व वाढत आहे. भाजपाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वबळावर लढणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. रवींद्र चव्हाण यांनी या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments