रवींद्र चव्हाण यांच्या दिलदार भूमिकेला निलेश राणेंचा सकारात्मक प्रतिसाद
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण यांच्या दिलदार भूमिकेला निलेश राणेंचा सकारात्मक प्रतिसाद
● रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यांचा अचानक बदललेला हा सूर एका अर्थाने रवींद्र चव्हाणांचा नैतिक विजय आहे. निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख थेट मोठा भाऊ असा करत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे कोकणच्या राजकारणात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. रवींद्र चव्हाण यांनीही यावेळी मनात कोणतीही अडी न ठेवता तसाच प्रतिसाद दिला आहे. रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या आरोपांना सुरुवातीलाही संयमाने उत्तर दिले होते. चव्हाण यांनी कधीही राणेंवर थेट वैयक्तिक टीका करणे टाळले. युतीतील अंतर्गत मतभेद स्थानिक पातळीवर असू शकतात, पण राज्याच्या स्तरावर महायुती अभेद्य आहे, असाच त्यांचा सूर होता. स्थानिक निवडणुकीत तात्पुरते वाद होत असले तरी, वरिष्ठ नेत्यांनी सामंजस्य दाखवून युतीधर्म पाळणे गरजेचे ठरते. रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेला हा मोठेपणा केवळ वाद मिटवण्यासाठी नसून, तो भविष्यात कोकणातील महायुतीची संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. चव्हाण यांच्या दिलदार भूमिकेनंतर, राणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या नव्या राजकीय सलोख्याचे स्वागत केले आहे. ही दिलजमाई महायुतीच्या मजबूत भविष्यासाठी एक सकारात्मक संकेत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments