रवींद्र चव्हाण यांचा सेवाव्रती प्रवास
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण यांचा सेवाव्रती प्रवास
● भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा एका सामान्य कार्यकर्त्याचा संघर्ष आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण मानला जातो. डोंबिवलीचे आमदार ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली असून, 'सेवाव्रती' ही त्यांची खरी ओळख बनली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या घवघवीत यशात चव्हाण यांच्या संघटनात्मक कौशल्याचा मोठा वाटा दिसून आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी 'संघटन पर्व' आणि 'गाव-वस्ती संपर्क' यांसारख्या मोहिमा प्रभावीपणे राबवल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाजपा सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कोणत्याही मोठ्या राजकीय पार्श्वभूमीशिवाय चव्हाण यांनी केवळ आपल्या कामाच्या जोरावर पक्षात स्थान निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठी बांधणी केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी २००९ पासून सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. त्यांच्या या विजयामागे त्यांचे जनसंपर्क आणि विकासकामांवरील पकड हे महत्त्वाचे कारण आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments