रवींद्र चव्हाण यांचा राज्याचा झंझावाती दौरा; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
- dhadakkamgarunion0
- Jan 8
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण यांचा राज्याचा झंझावाती दौरा; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
● महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी चव्हाण यांनी विविध जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे सत्र आयोजित केले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. चव्हाण यांनी पुण्यातून प्रचाराचा शंखनाद करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लातूर, संभाजीनगर असा प्रचाराचा दौरा केला. कोकणातून आपल्या राजकीय प्रवासाची मजबूत पायाभरणी करणाऱ्या चव्हाण यांनी आता नाशिक आणि अहमदनगर सारख्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोकणात ज्याप्रमाणे भाजपाने यश मिळवले, तशीच पुनरावृत्ती संपूर्ण राज्यात व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नाशिकमध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांशी संवाद साधला आणि गटतट बाजूला सारून केवळ कमळ चिन्हासाठी काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments