top of page

रवींद्र चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा

  • dhadakkamgarunion0
  • Dec 3
  • 1 min read

🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]

▪️==================▪️

रवींद्र चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा

● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या सूचक वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 'दोन नंबर तो दोन नंबरच असतो, नंबर दोनला काही किंमत नसते,' असे विधान त्यांनी केले आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, 'राज्यात मुख्यमंत्री हेच सर्व काही असतात. दोन नंबर, तीन नंबरच्या स्थानाला राजकीय महत्त्व नसते.' त्यांनी हे विधान करताना दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या एका जुन्या भाषणाचा संदर्भ दिला. पाटील यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना उद्देशून विधानसभेत म्हटले होते की, 'खडसे साहेब, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबरला काहीच अर्थ नसतो. एक नंबरलाच महत्त्व असते.' याच विधानाची री ओढत चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. याच उदाहरणाचा आधार घेऊन रवींद्र चव्हाण यांनी 'एक नंबर'च्या म्हणजेच मुख्यमंत्रिपदाच्या सर्वोच्च स्थानावर जोर दिला. त्यांच्या मते, राज्याच्या नेतृत्वामध्ये फक्त 'नंबर एक'चे स्थानच निर्णायक ठरते. रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला आाहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page