रवींद्र चव्हाण : तत्वनिष्ठ आणि सेवाव्रती व्यक्तिमत्व
- dhadakkamgarunion0
- Jan 21
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण : तत्वनिष्ठ आणि सेवाव्रती व्यक्तिमत्व
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जवळून ओळखणारे लोक त्यांच्या शिस्तीबद्दल आणि कामाच्या पद्धतीबद्दल नेहमीच आदर व्यक्त करतात. त्यांनी कधीही सत्तेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी न करता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यावर भर दिला. त्यांच्याकडे असलेल्या कामाच्या झपाट्यामुळेच त्यांना सेवाव्रती ही पदवी सार्थ ठरते. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा हा नेता आता राज्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा देत आहे. चव्हाण यांची ओळख एक अभ्यासू, संयमी आणि पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानणारे नेते अशी आहे. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अतिशय खालच्या स्तरावरून केली. त्यांनी नगरसेवकपदापासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या आहेत. विशेषतः कोकण पट्ट्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांच्या संघटन कौशल्याची पावतीच आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments