रवींद्र चव्हाण ठरले भाजपाच्या विजयाचे मुख्य शिल्पकार
- dhadakkamgarunion0
- 13 hours ago
- 1 min read

🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण ठरले भाजपाच्या विजयाचे मुख्य शिल्पकार
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. दिवस-रात्र पक्षाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेणारा एक समर्पित कार्यकर्ता ते राज्याचा प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केले, त्यामुळेच आज भाजपाला हे मोठे यश संपादन करता आले आहे. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वात आधी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्यात आले. प्रत्येक बूथ स्तरावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले, ज्याचा फायदा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी भाजपाला झाला. त्यांचे हे संघटन कौशल्य विजयाचा पाया ठरले. रवींद्र चव्हाण यांनी केवळ घोषणाबाजीवर लक्ष न देता, जमिनीवर उतरून काम करण्याला प्राधान्य दिले. मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी राबवलेली यंत्रणा विरोधकांसाठी डोकेदुखी ठरली. त्यांच्या या रणनीतीमुळे अनेक बालेकिल्ल्यांमध्ये भाजपाने आपले वर्चस्व निर्माण केले.
©️ -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments