रवींद्र चव्हाण : कार्यकर्ताभिमुख, आक्रमक राजकीय व्यक्तिमत्व
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण : कार्यकर्ताभिमुख, आक्रमक राजकीय व्यक्तिमत्व
● भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे राजकीय व्यक्तिमत्व आक्रमक, कार्यकर्ताभिमुख आणि धडाडीचे आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्याच्या प्रमुख राजकीय पदापर्यंत पोहोचला आहे. चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे चव्हाण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. कोकण आणि पालघरसारख्या आव्हानात्मक प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांची पक्षातील कामगिरी सिद्ध झाली आहे. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, राष्ट्रीय विचारधारेवर निष्ठा आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी हा प्रदीर्घ पल्ला गाठला आहे. चव्हाण यांच्या संघटन कौशल्याची चुणूक नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसली. कोकण प्रदेशाचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी महायुतीच्या ३९ पैकी तब्बल ३५ जागांवर विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments