युवा कार्यकर्त्यांसाठी रवींद्र चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास
- dhadakkamgarunion0
- Dec 4
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
युवा कार्यकर्त्यांसाठी रवींद्र चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास
● भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा त्यांची संघटनात्मक ताकद आणि अथक मेहनत सिद्ध करतो. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना, अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या प्रमुख पदापर्यंतचा त्यांचा प्रवास युवा कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलून पक्षाचा विश्वास कायम राखला. एक निष्ठावान सदस्य आणि प्रभावी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही प्रभावीपणे काम केले आहे. २०१६ ते २०१९ दरम्यान त्यांनी बंदरे, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०२२ ते २०२४ या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. या बळावरच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments