मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
- dhadakkamgarunion0
- Aug 19
- 1 min read
Updated: Aug 20
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
● दहीहंडीच्या व्यासपीठावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘मुंबई आणि ठाण्यात वर्षानुवर्षे लुटणाऱ्यांची हंडी फोडली आहे. आता या ठिकाणी नवीन विकासाची हंडी लावली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल,’ असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या ऐतिहासिक उत्सवात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘खऱ्या अर्थाने आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. ही हंडी ऐतिहासिक आहे कारण ती कोणत्याही एका व्यक्तीची नसून लोकांच्या कष्टाची हंडी आहे.’
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments