top of page

मुख्यमंत्री फडणवीसांना ‘ग्रँडमास्टर’ म्हणत भाजपाकडून होतेय विशेष कौतुक

  • dhadakkamgarunion0
  • 3 days ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मुख्यमंत्री फडणवीसांना ‘ग्रँडमास्टर’ म्हणत भाजपाकडून होतेय विशेष कौतुक

● महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रणनीतीने विरोधकांना चारी मुंड्या चीत करणारे भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. यापूर्वी त्यांना ‘आधुनिक चाणक्य’ किंवा लाडके ‘देवाभाऊ’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘ग्रँडमास्टर’ ही नवीन पदवी बहाल केली आहे. फडणवीसांच्या अचूक राजकीय चालींमुळे विरोधक निरुत्तर झाले असून, भाजपामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी लावलेल्या डिजिटल फलकांवर देवेंद्र फडणवीस यांना बुद्धिबळाच्या पटासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या या नवीन प्रतिमेचे हजारो नेटीझन्सकडून स्वागत होत आहे. ज्याप्रमाणे बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर आपल्या प्रतिस्पर्ध्याला ‘चेकमेट’ करतो, त्याचप्रमाणे फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांना शह दिला असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page