मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणार हास्य
- dhadakkamgarunion0
- Oct 8
- 1 min read
Updated: Oct 14
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणार हास्य
● महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले होते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापूरानं लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली. हातातले पीक वाहून गेले आणि शेतकऱ्यांचे दिवस-दिवस काळोखात गेले. या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मदत तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश दिले असून, ‘यानंतरही मदत लागली तर ती आम्ही देणारच,’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या पॅकेजनुसार ६८ लाख ६९ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून, ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला जाणार आहे. याशिवाय २५३ तालुक्यांना थेट मदत दिली जाणार आहे. बियाणे आणि खतांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. हंगामी बागायतदारांना २७ हजार, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५००, आणि बुजलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर पुन्हा नव्याने उभं राहण्याची संधी आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments