मुख्यमंत्री फडणवीसांच्या दूरदृष्टीचे यश: विंग ग्रुपची महाराष्ट्रात ५४,००० कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक!
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दूरदृष्टीचे यश: विंग ग्रुपची महाराष्ट्रात ५४,००० कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत आघाडी घेतली आहे. विंग ग्रुपच्या या मोठ्या प्रकल्पामुळे राज्यात केवळ भांडवलच येणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक संपूर्ण नवीन उद्योग व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक टॅक्सी आणि बसेसच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला जाईल. महाराष्ट्र राज्य जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये आता एक नवा अध्याय जोडला जात असून व्हिएतनाममधील आघाडीची कंपनी 'विंग ग्रुप' महाराष्ट्रात ५४,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, 'मुंबई' आणि व्हिएतनाममधील 'हो ची मिन्ह सिटी' यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला असून, या माध्यमातून दोन्ही शहरांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. विंग ग्रुपच्या वतीने राज्यात सुमारे १,००० हेक्टर क्षेत्रावर एका भव्य एकात्मिक टाउनशिपची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाची निवासी संकुले, व्यावसायिक केंद्रे आणि मनोरंजन सुविधांचा समावेश असेल. मुंबई ३.०च्या संकल्पनेनुसार या शहराची आखणी केली जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


Comments