मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा; संजय राऊतांकडून कौतुक
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा; संजय राऊतांकडून कौतुक
● शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमी भूमिकेची प्रशंसा केली आहे. अलीकडेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळली. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी आंदोलकांवर केलेली कडवट टीका पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा असल्याचे राऊत म्हणाले. जेव्हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले, तेव्हा भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात अत्यंत वाईट आणि हीन दर्जाची भाषा वापरली. या परिस्थितीतही फडणवीस यांनी संयम न सोडल्यामुळेच आंदोलनाचा शांततेत शेवट झाला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments