मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्परता दाखवत केंद्र सरकारकडून मिळवले सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
- dhadakkamgarunion0
- Mar 6
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्परता दाखवत केंद्र सरकारकडून मिळवले सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
● मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्रातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य सरकार अत्यंत वेगाने हालचाली करत असून अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. या संकटात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तत्परता दाखवत केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन मिळवले आहे. मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक तासाला तिथल्या घडामोडींचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की, प्रशासन प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दुबई येथील 'इंडियन पीपल्स फोरम' या संस्थेच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने एक विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ज्या नागरिकांना मदतीची गरज आहे किंवा ज्यांचे नातेवाईक आखाती देशांत अडकले आहेत, त्यांनी तात्काळ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे अडकलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान आणि त्यांची गरज समजणे सोपे होणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


Comments