मुख्यमंत्री फडणवीस यांनी खास शैलीत घेतला विरोधकांचा समाचार
- dhadakkamgarunion0
- 9 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीस यांनी खास शैलीत घेतला विरोधकांचा समाचार
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत बोलताना आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ‘देवा भाऊ जो बोलतो ते करतोच, आणि जे बोलत नाही ते तर नक्कीच करतो,’ अशा शब्दांत त्यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणादरम्यान सांगितले की, राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाहीत. विशेषतः महिलांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांवरून त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. 'देवा भाऊ' हे नाव जनतेने दिलेले प्रेमाचे नाव असून, या नावाचा मान राखण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आजवर दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. "आम्ही केवळ हवेत गप्पा मारणारे लोक नाही, तर जमिनीवर काम करून दाखवणारे आहोत," असे त्यांनी ठणकावून सांगितले. विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण योजनेवर टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत तुमचा हा 'देवा भाऊ' सत्तेत आहे, तोपर्यंत माता-भगिनींच्या हक्काचे पैसे कुणीही थांबवू शकणार नाही.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments