मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य
- dhadakkamgarunion0
- 13 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर 'कोण होतास तू, काय झालास तू' अशी बोचरी टीका केली आहे. फडणवीस यांनी हा टोला लगावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हिंदुत्व आणि विचारधारेपासून फारकत घेतल्याचा थेट संदेश दिला आहे. या टीकेमागे एक स्पष्ट राजकीय धोरण दडलेले आहे. महायुतीला आगामी निवडणुकीत मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांना आपल्या बाजूने वळवायचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाविकास आघाडी ही धर्मनिरपेक्ष आणि मूलभूत विचारधारेपासून दूर गेल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. फडणवीसांचे विधान हे भाजपाच्या आक्रमक राजकारणाचा भाग आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मूळ समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्देश आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पारंपरिक हिंदुत्ववादी विचारधारेला तिलांजली दिली. २०१९ मध्ये भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यापासून भाजपा नेत्यांकडून वारंवार ही टीका केली जात आहे. 'बाळासाहेबांचे हिंदुत्व' सोडून त्यांनी राजकीय तडजोड केल्याचा आरोप 'कोण होतास तू...' या वाक्यातून अधिक धारदारपणे समोर आला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments