मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका
- dhadakkamgarunion0
- Jan 21
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका
● स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक विकासाबाबत अत्यंत सकारात्मक घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, आगामी काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरू होईल आणि याद्वारे तब्बल ३५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दावोसमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी झालेल्या करारामुळे राज्याच्या विविध क्षेत्रांत प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. विशेषतः पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. भारतात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा हा एकट्या महाराष्ट्रात येत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात विश्वासार्ह राज्य म्हणून ओळखले जात आहे. जागतिक मंदीचे सावट असले तरी महाराष्ट्राचा विकासदर स्थिर असून, राज्याने गेल्या दशकात सातत्याने १० टक्क्यांहून अधिक प्रगती साधली आहे. यामुळेच जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्राला मिळत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments