मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
- dhadakkamgarunion0
- Nov 6, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
● उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधताना ‘उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारण्याचे काम करतात, त्यापलीकडे ते ठोस काहीही करू शकत नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या कार्यशैलीवर बोचरी टीका केली. फडणवीस म्हणाले की, काही लोक केवळ टीका करण्यावर आणि टोमणे मारण्यावर आपला वेळ घालवतात. परंतु, केवळ टोमणे मारून जनमानसात स्थान मिळवता येत नाही. लोकांसाठी प्रत्यक्ष विकासकामे करावी लागतात. आमच्या सरकारने केलेल्या कामांची यादी मोठी आहे, पण विरोधकांकडे टोमणे मारण्याशिवाय दुसरे कोणतेही ठोस काम नाही. विकास कामांऐवजी केवळ नकारात्मकता पसरवून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, असे परखड मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments