मुंबईला पाकिस्तान होण्यापासून वाचवणारच; अमित साटम यांचा निर्धार
- dhadakkamgarunion0
- Dec 22, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
मुंबईला पाकिस्तान होण्यापासून वाचवणारच; अमित साटम यांचा निर्धार
● मुंबईला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या मार्गावर जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिला आहे. विरोधकांच्या धोरणांमुळे शहराचे जनसांख्यिकीय स्वरूप बदलत असून, मुंबईच्या अस्मितेचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. साटम यांच्या मते, मतांच्या राजकारणासाठी ठराविक वर्गाचे लांगूलचालन केले जात असून, यामुळे मुंबईची मूळ संस्कृती धोक्यात आली आहे. साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडणाऱ्यांमुळेच आज मुंबईत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांनी आता बदलाची वेळ आली असल्याचे नमूद केले. मुंबईला 'व्होट बँक' बनवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments