मुंबईतील कबुतरखान्यांवर आता नवीन नियम, मुख्यमंत्री फडणवीसांनी काढला 'मध्यम मार्ग'
- dhadakkamgarunion0
- Aug 6
- 1 min read
Updated: Aug 7
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुंबईतील कबुतरखान्यांवर आता नवीन नियम, मुख्यमंत्री फडणवीसांनी काढला 'मध्यम मार्ग'
● मुंबईतील कबुतरखान्यांवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाद आणि तणावावर अखेर तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत, कबुतरखान्यांवर अचानक बंदी घालणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर मुंबई महानगरपालिकेने काही कबुतरखाने बंद केले होते, त्यामुळे कबुतरप्रेमी आणि जैन समुदायाने तीव्र विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि यावर एक संतुलित तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत एक नवी नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, कबुतरांना खाद्य देण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित करावी, जेणेकरून नियंत्रित खाद्यपुरवठा शक्य होईल. यामुळे कबुतरांची संख्या नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. यासोबतच, कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या स्वच्छतेच्या प्रश्नावर विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments