मुंबईत भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा बोलबाला!
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
मुंबईत भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा बोलबाला!
● मुंबईच्या राजकारणात सध्या साटम यांचाच बोलबाला दिसून येत आहे. साटम यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांनी मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अमित साटम यांनी न्यूयॉर्कमध्ये एका 'खान' आडनावाच्या व्यक्तीच्या महापौर निवडीचा संदर्भ देत मुंबईबाबत मोठे विधान केले होते. मुंबईचे स्वरूप बदलण्याचा आणि येथे 'खान' लादण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाकडे होता. त्यांच्या मते, मुंबईतील जनतेला उत्तम रस्ते, पाणी आणि स्थानिक सुविधा देणारा महापौर हवा आहे, जो मराठी आणि हिंदुत्ववादी विचारांचा असेल. या विधानामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वीच मराठी मतदारांच्या भावनांना हात घातल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित साटम यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवरही भाष्य केले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. केवळ सण-समारंभापुरते त्यांचे एकत्र येणे हे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे नाही, तर मुंबईच्या विकासाचे खरे सूत्रधार भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीचेच असतील, असे साटम यांनी ठामपणे सांगितले. मुंबईतील विकासकामांवरून त्यांनी ठाकरे गटावर २५ वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments