मुंबईचा महापौर खुर्चीसाठी नाही, मुंबईकरांसाठी असेल; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
- dhadakkamgarunion0
- Sep 18
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुंबईचा महापौर खुर्चीसाठी नाही, मुंबईकरांसाठी असेल; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या एका मेळाव्यात बोलताना 'मुंबईचा महापौर खुर्चीसाठी नाही, तर मुंबईकरांसाठी असेल' असे म्हणत विरोधकांवर, विशेषतः ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. फडणवीसांनी आपल्या भाषणात भाजपाचा मुंबईतील विकास आणि लोकाभिमुख राजकारणावर भर दिला. या भाषणादरम्यान फडणवीसांनी 'ब्रँड' या शब्दाचा उल्लेख करून ठाकरे बंधूंना टोला लगावला. 'काही लोकांना वाटते की त्यांच्याकडे ब्रँड आहे, पण आमच्याकडे मोदी ब्रँड आहे,' असे म्हणत त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित केला. लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपाला मिळालेल्या यशाचा संदर्भ देत, त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीतही हाच 'मोदी ब्रँड' चालणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईच्या विकासासाठी पारदर्शक कारभार आणि निधीचा योग्य वापर हे भाजपाचे उद्दिष्ट असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments