महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षऱ्या
- dhadakkamgarunion0
- Sep 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षऱ्या
● गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. टेरिफ वॉर सुरू असतानाही महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणे हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वासच दर्शवितो असेही ते म्हणाले. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करार स्वाक्षरीत करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही.‘
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments