महाराष्ट्रात पेट्रोलचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्रात पेट्रोलचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
● राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘राज्यात इंधनाची कोणतीही कमतरता नाही, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.’ केवळ चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अनावश्यक गर्दीमुळे पुरवठा साखळीवर तात्पुरता ताण आला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे की, तेल कंपन्यांकडे पुढील महिनाभरासाठी पुरेल इतका पुरेसा साठा उपलब्ध आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा भारताच्या इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंधनाचा तुटवडा ही केवळ एक अफवा आहे. नागरिक भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन भरून ठेवत आहेत, ज्यामुळे पंपांवरील साठा वेगाने संपत आहे. ही स्थिती केवळ ताळमेळ बिघडल्यामुळे निर्माण झाली आहे. प्रशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


Comments