महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- dhadakkamgarunion0
- Sep 9
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
● राज्याच्या विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. पुढील दोन दशकांचा विचार करून सरकारने एक व्यापक दिशा ठरवण्याचे काम हाती घेतले आहे. या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा करत राजकारणात व समाजात नवे वारे वाहतील, अशी खात्री दिली. एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. बैठकीत पाणी, वीज, शिक्षण, उद्योग, सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण, सामाजिक कल्याण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उत्तम प्रशासन, सायबर सुरक्षा, भारत नेट रिंग, सहकार क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता यावर विशेष भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. ‘आपल्या लक्ष्याची दिशा स्पष्ट असली पाहिजे. हे केवळ कागदोपत्री सादरीकरण राहणार नाही. २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू,’ असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments