महाराष्ट्र घेणार १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे गरुडझेप; मुख्यमंत्री फडणवीसांचा दृढ संकल्प
- dhadakkamgarunion0
- Jul 31
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्र घेणार १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे गरुडझेप; मुख्यमंत्री फडणवीसांचा दृढ संकल्प
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. महाराष्ट्राने यापूर्वीच अर्ध्या ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला असून, येत्या काही वर्षांत राज्याला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणे राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारने सुस्पष्ट धोरणे आखली आहेत. केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न राहता, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक आणि रायगड यांसारख्या प्रदेशांमध्ये औद्योगिक विकास वेगाने वाढवत आहे. इलेक्ट्रिक वाहन हब, स्टील सिटी आणि एकात्मिक औद्योगिक टाऊनशिप्सच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात औद्योगिक क्रांती घडवून आणली जात आहे. राज्याने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १०० बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यात वाढवण बंदर, नागपूर-गोवा महामार्ग, नवीन विमानतळ, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प राज्याच्या व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेला नवे आयाम देतील.
©️ -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments