महायुतीमधील संघर्षाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
- dhadakkamgarunion0
- Dec 4
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महायुतीमधील संघर्षाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
● सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वाढलेला तणाव आणि जागावाटपावरून सुरू असलेल्या संघर्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्याने पूर्णविराम दिला आहे. भाजपा ताकद वाढत असली तरी, भाजपा मित्रपक्षांना कधीही सोडून देणार नाही आणि येणारी २०२९ ची विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यांचे हे विधान विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांना मोठा दिलासा देणारे ठरले आहे, कारण त्यांच्यामध्ये भाजपाच्या वाढत्या बळामुळे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल चिंता वाढली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, 'भाजपा स्वतःचा विस्तार करत राहील, कारण पक्षाचे कार्य वाढवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. मात्र, हा विस्तार मित्रपक्षांना कमकुवत करून होणार नाही.' त्यांनी युतीधर्माचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महायुतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भिन्न मते असू शकतात, पण मुख्य ध्येय राज्याचा विकास हेच आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments