top of page

महायुतीची एकत्रित रणनीती; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत

  • dhadakkamgarunion0
  • Jul 29
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

महायुतीची एकत्रित रणनीती; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत

● महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणे लढणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महायुतीच्या या भूमिकेमुळे आघाडीच्या संभाव्य रणनीतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, ‘एखाद्या विशिष्ट ठिकाणी स्थानिक पातळीवर काही वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र व्यापक धोरण म्हणून महायुती एकत्रितपणेच निवडणूक लढवेल.’ यामागे एकजुटीने अधिक जागा जिंकणे आणि विरोधकांना मजबूत आव्हान देणे हा उद्देश आहे. विशेषतः ज्या ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये काही मतभेद किंवा जागावाटपाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, तिथे समन्वय साधून मैत्रीपूर्ण लढत करण्याचा विचारही असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. परंतु, अशा ठिकाणीही मित्रपक्षांवर टीका करणे टाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page