महसूल विभागाचा तंत्रज्ञानाधारित कायापालट; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
- dhadakkamgarunion0
- Aug 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महसूल विभागाचा तंत्रज्ञानाधारित कायापालट; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
● राज्यातील महसूल विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासकीय प्रक्रिया सोप्या आणि जलद बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. महसूल परिषदांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसोबत सातत्याने विचारमंथन करून ते या बदलांना गती देत आहेत. 'डिजिटल इंडिया - भूमी अभिलेख आधुनिकीकरण' कार्यक्रमांतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्प राज्यात यशस्वीपणे राबवले जात आहेत, ज्यामुळे महसूल प्रशासनाचा चेहरामोहरा बदलत आहे. 'ई-फेरफार' आणि 'ई-पीक पाहणी' सारख्या प्रकल्पांनी महसूल प्रशासनात पारदर्शकता वाढली आाहे. डिजिटल सुविधांमुळे आता नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहिली नाही. यामुळे केवळ प्रशासकीय कामात सुलभता आली नसून, नागरिकांनाही जलद आणि पारदर्शक सेवा मिळत आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments