मराठा समाजाच्या हितासाठी लढणारे 'हिरो' म्हणून मुख्यमंत्री फडणवीस येत आहेत पुढे
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मराठा समाजाच्या हितासाठी लढणारे 'हिरो' म्हणून मुख्यमंत्री फडणवीस येत आहेत पुढे
● मराठा आरक्षण हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. परंतु, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची यशस्वीपणे हाताळणी करत मराठा समाजासाठी एक नवीन आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे समाजात समाधानाची लाट पसरली आहे. फडणवीस यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे, ते मराठा समाजाच्या हितासाठी लढणारे 'हिरो' म्हणून पुढे येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या मनात एक मोठी भीती होती की त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल. ही भीती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांशी आणि संघटनांशी सतत संवाद साधला. त्यांनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments