मराठा आरक्षणामागे राजकीय नेत्यांचा हात; मुख्यमंत्री फडणवीसांचा सूचक इशारा
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मराठा आरक्षणामागे राजकीय नेत्यांचा हात; मुख्यमंत्री फडणवीसांचा सूचक इशारा
● मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजकीय पक्ष आणि नेत्यांवर निशाणा साधला. आंदोलनामागे कोणाचे पाठबळ आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी काही राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा या आंदोलनात थेट सहभाग असल्याचा सूचक इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनामागे काही नेत्यांचा थेट हात असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, "काही राजकीय पक्ष आणि नेते केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी मराठा समाजाचा वापर करत आहेत. ते समाजाला भडकवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत." फडणवीस यांनी या नेत्यांना मराठा समाजाची दिशाभूल थांबवण्याचा इशारा दिला. राज्याची सामाजिक वीण जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही ते म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments