मराठा आरक्षण संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विचारमंथनातूनच
- dhadakkamgarunion0
- Sep 12
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मराठा आरक्षण संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विचारमंथनातूनच
● मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या सखोल विचारमंथनातूनच झाले आहेत. त्यामुळे सरकारने जारी केलेला ‘जीआर’ अर्थात शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका सरकारने मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही. केवळ ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत, अशाच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. हा जीआर पुराव्यांवर आधारित असून, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. हे निर्णय कायदेशीर चौकटीत बसणारे आहेत, जेणेकरून भविष्यात न्यायालयामध्ये ते टिकतील.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments