मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देणारी मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- Nov 5, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देणारी मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● महाराष्ट्र सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यावसायिक आणि मत्स्य कास्तकारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, मत्स्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणेच वीजदर सवलत लागू होणार आहे. या निर्णयामुळे मासेमारी आणि संबंधित उद्योगांचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि संबंधित उद्योगाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने मच्छीमारांना अनेक शासकीय योजनांचे लाभ मिळणार आहेत. वीज दरात सवलतीसह त्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा, कृषी दरांनुसार कर्ज, सौर ऊर्जेचे लाभ आणि मत्स्यशेतीसाठी आर्थिक मदत मिळण्यास ते पात्र ठरतील. मच्छीमारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments