भाषणाने पोट नाही भरत; मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- dhadakkamgarunion0
- Oct 17
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
भाषणाने पोट नाही भरत; मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटावर कडक शब्दांत टीका केली आहे. ‘तुमच्या भाषणाने कुणाचे पोट भरत नाही,’ असे स्पष्टपणे सांगत त्यांनी केवळ टीका आणि घोषणाबाजी करण्याऐवजी विकासकामे करण्यावर भर दिला. फडणवीस यांनी ठाकरे गटाला उद्देशून म्हटले की, केवळ भाषणे ठोकायची आणि निघून जायचे, इतकेच विरोधकांना जमते. त्यांच्या काळात संपूर्ण मुंबईत झालेले एक तरी काम त्यांनी दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. वास्तविक विकासकामे, रोजगार संधी आणि लोकांसाठी सुविधा निर्माण केल्यानेच सामान्यांचे पोट भरते, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील ४५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसन प्रकल्प आता महायुती सरकारने मार्गी लावला आहे. केवळ टीका न करता ठोस काम करून दाखवण्याची महायुतीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments