भगवा दहशतवाद' हा काँग्रेसचा कट; मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार टीका
- dhadakkamgarunion0
- Aug 1
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
भगवा दहशतवाद' हा काँग्रेसचा कट; मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार टीका
● मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारने मतांच्या राजकारणासाठी 'हिंदू दहशतवादा'चा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण हिंदू समाजाची बदनामी करण्याचा हा कट होता. न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने आता काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी सांगितले की, काँग्रेसने जाणूनबुजून 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग तयार केला. ९/११ च्या हल्ल्यानंतर जगभरात इस्लामिक दहशतवादावर चर्चा होत असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने हिंदू दहशतवादाची संकल्पना मांडली. हा प्रकार केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी करण्यात आला होता..
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments