बेस्ट पतपेढी निवडणुक निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका
- dhadakkamgarunion0
- Aug 21
- 1 min read
Updated: Aug 22
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बेस्ट पतपेढी निवडणुक निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका
● बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘राजकारण करण्याचे ठिकाण नव्हते, तरीही त्यांनी या निवडणुकीचे राजकारण केले. 'ठाकरे ब्रँड'ची मोठी चर्चा झाली, मात्र मतदारांनी या निवडणुकीत त्यांना पूर्णपणे नाकारले आहे.” या निकालाकडे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते, ज्यामुळे या पराभवाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या 'सहकार समृद्धी' पॅनलने यश मिळवले आहे. या पॅनेलने ७ जागा जिंकून पतपेढीमध्ये आपली मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. हा निकाल महायुतीसाठी मुंबईतील आगामी निवडणुकांपूर्वी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments