पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष भर
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष भर
● नागपूर शहराला ६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भाष्य करताना सांगितले की, सध्याच्या काळात सायबर आणि संगणक साक्षरता अत्यंत आवश्यक आहे. या ड्युटी मीटमध्ये सायबर अवेयरनेस आणि डिजिटल तपास यंत्रणेवर विशेष सत्रे घेतली जातील. या मीटमध्ये सायबर गुन्हे तपास, श्वान पथक स्पर्धा आणि व्हिडिओग्राफी यांसारख्या आधुनिक विषयांवर विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राने यापूर्वीच देशातील सर्वोत्तम सायबर लॅब उभारली असून, तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्र पोलीस दल अग्रेसर आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पुराव्यांची शास्त्रोक्त तपासणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस दल फॉरेन्सिक असिस्टंटचा वापर करून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहे. राज्याचे पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे आणि प्रगत दल म्हणून ओळखले जाते. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून तपासाची गती आणि गुणवत्ता वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



Comments