पोलिसांच्या घरांसाठी धोरण तयार; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
- dhadakkamgarunion0
- 55 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पोलिसांच्या घरांसाठी धोरण तयार; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील जीर्ण झालेल्या आणि धोकादायक बनलेल्या पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील पोलिसांना हक्काची आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना चांगले, सुरक्षित आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त घर मिळावे, या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना नाइलाजाने घरांपासून दूर राहावे लागते किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहावे लागते. या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पोलिसांना कमी किमतीत शहरांमध्येच हक्काची घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरात राहून कर्तव्यावर येणाऱ्या पोलिसांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments