पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडली प्रभावशाली नेतृत्वाची छाप
- dhadakkamgarunion0
- Jul 21
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडली प्रभावशाली नेतृत्वाची छाप
● २०२५च्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे एक स्पष्ट चित्र सभागृहात मांडले. पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि जनतेला सुरक्षित व आश्वासक भविष्य देणे यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे राज्याच्या प्रगतीला वेग मिळेल अशी अपेक्षा आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यावर भर दिला. मुंबईला 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय त्यांनी मांडले. तसेच, राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीसह सांगितले आणि सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर कॉर्पोरेशनची स्थापना केल्याची माहिती दिली. राज्याच्या शाश्वत विकासासाठी 'ब्लू प्रिंट' तयार करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील असे आश्वासनही त्यांनी दिले. 'पीएम कुसुम योजने'अंतर्गत राज्यात ६० टक्के कृषी पंप बसवण्यात आले असून, यामुळे २३ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ ३० लाख कुटुंबांना होणार असून, त्यांना वीजबिल भरावे लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments