top of page

पालघरच्या वाढवणजवळ चौथी मुंबई उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

  • dhadakkamgarunion0
  • 5 days ago
  • 1 min read

Updated: 8 hours ago

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

पालघरच्या वाढवणजवळ चौथी मुंबई उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

● मुंबई महानगराचा वाढता ताण कमी करण्यासाठी आणि राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरामध्ये 'चौथी मुंबई भारण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. नवी मुंबई विमानतळाजवळ 'तिसरी मुंबई' साकारत असतानाच, आता वाढवणजवळ आणखी एका नव्या जागतिक दर्जाच्या शहराची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षाही उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले शहर ठरेल. या शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. वाढवण बंदराजवळ देशातील पहिले 'ऑफशोअर' विमानतळ उभारण्याची योजना आहे. तसेच, वर्सोवा-विरार-पालघर सागरी मार्गाचा विस्तार याच बंदरापर्यंत केला जाईल. यामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हे अंतर अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होईल. याच बरोबर बुलेट ट्रेनचा प्रकल्पही या शहरातून जाणार असून, त्याचे स्थानक पालघर जिल्ह्यात असणार आहे. हे सर्व प्रकल्प भविष्यात या नव्या शहराला आर्थिक विकास केंद्र बनवतील.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page